भाजप-शिवसेना की काँग्रेस-राष्ट्रवादी? तुम्हीच करा यांचं विश्‍लेषण! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

विश्‍लेषण फक्त पत्रकारांनीच करावं, असं थोडंच आहे! तुम्हीही बिनधास्त मांडा तुमची मतं आणि निरीक्षणं.. किमान 150 शब्दांत लेख लिहा आणि ई-मेल करा webeditor@esakal.com इथे आणि सब्जेक्‍टमध्ये लिहा 'माझे विश्‍लेषण'!

मुंबई : नगरचं राजकारण हा आज संपूर्ण देशात चर्चेच्या विषय झाला आहे. गोष्ट साधी नव्हे.. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच सत्ताधारी भाजपच्या गोटात जातो आणि त्यामुळे या भागातील राजकारणालाच वेगळं वळण मिळतं, हा देशाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा विषय ठरलाच.. 

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगेचच नगरमधून खासदारकीसाठी उमेदवारीही मिळविली. आता विद्यमान खासदार दिलीप गांधी काय पाऊल उचलणार, हा एक प्रश्‍न भाजपसमोर असेलच. पण त्याहून मोठा प्रश्‍न काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसमोर उभा ठाकला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भाजपशी लढण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर पक्षांतर्गत नाराजीचेच आव्हान मोठं आहे, असं दिसायला लागलं आहे. 

या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटते? 
- मुख्यमंत्री फडणवीस हे यंदाची निवडणूक भाजपच्या बाजूने फिरवू शकतील? 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीशिवाय आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसमोर फडणवीस यांचे आव्हान असेल का? 
- विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर काय अडचणी येतील? 
- यंदाच्या निवडणुकीत वारं कुठं वाहत आहे? 

विश्‍लेषण फक्त पत्रकारांनीच करावं, असं थोडंच आहे! तुम्हीही बिनधास्त मांडा तुमची मतं आणि निरीक्षणं.. किमान 150 शब्दांत लेख लिहा आणि ई-मेल करा webeditor@esakal.com इथे आणि सब्जेक्‍टमध्ये लिहा 'माझे विश्‍लेषण'!

Web Title: BJP Shiv Sena NCP and Congree Who will have upper hand in LokSabha 2019