Loksabha 2019 : खोटं बोलण्यात भाजप अव्वल : हितेंद्र ठाकूर

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

- एकवेळेस साबण-तेल जाहिरात बघून घेतलं तर चालेल. पण पंतप्रधान जाहिरात बघून घेऊ नका. 

पालघर : भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते. तसेच खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे, असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत हितेंद्र ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, एकवेळेस साबण-तेल जाहिरात बघून घेतलं तर चालेल. पण पंतप्रधान जाहिरात बघून घेऊ नका. भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने इंदिरा गांधी, विलासराव देशमुख, स. का. पाटील यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते? भाजप फक्त 
केकाटून, खोटं बोलण्यात अव्वल आहे. खोटं बोल पण रेटून बोल, असा भाजपचा अजेंडा आहे. 

भाजपने श्रीनिवास वनगा यांची वाट लावली. त्यानंतर भाजप-सेनावाल्यांनी योगीच्या नावाने शिमगा केला. सेनेला टोळा गुंड चालेल पण शंड चालणार नाही, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is on top for speaking lies says Hitendra Thakur