Loksabha 2019 : देशात होतंय जातीचे राजकारण : संजय राऊत

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

- 2014 सारखं वातावरण सध्या देशात नाही

- देशात काही प्रमाणावर होतंय जातीवर राजकारण

नाशिक : देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. आता 2014 सारखं वातावरण नसले तरीदेखील मतदार विचलित होणार नाहीत. देशात काही प्रमाणावर जातीवर राजकारण होत आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (गुरुवार) सांगितले. 

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, सध्या विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही. राम मंदिराची उभारणी राहुल गांधी करू शकत नाहीत. आता या राम मंदिराची बांधणी पंतप्रधान मोदीच करतील. सध्या मोदींची लाट नाही पण तरीदेखील विजय आमचाच होईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच मनसेने भूमिका बदलली आहे. हे आता जनतेला मान्य नाही, असेही ते राऊत म्हणाले. 

दरम्यान, वंचित आघाडीचा फायदा कोणाला होईल, हे आता माहीत नाही. मात्र, ते स्वतंत्र आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे काही वक्तव्यं हिंदुत्वाविरोधात आहेत. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे आम्ही स्वागत करतो, असे संजय राऊत म्हणाले.

Web Title: Caste politics in the country says Sanjay Raut