Loksabha 2019 : भाषणाच्या क्लिप इंदापूरच्या, धुराळा दौंडमध्ये

रमेश वत्रे
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : इंदापूरमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या क्लिपने दौंडमधील सोशल मिडीयावर सध्या राळ उठवून दिली आहे.  

पुणे : इंदापूरमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या क्लिपने दौंडमधील सोशल मिडीयावर सध्या राळ उठवून दिली आहे.  

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. कांचन कुल यांची मोठी भिस्त ही इंदापूर, भोर, पुरंदरमधील काँग्रेसच्या नाराज मतदारांवर आहे. या मतदारांना हवा देण्याचे काम दौंडमधील भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत. यासाठी सोशल मीडियाची मोठया प्रमाणात मदत घेतली जात आहे. इंदापूर तालुक्यात यापुर्वी झालेल्या कार्यक्रमांच्या क्लिप दौंडमध्ये सोशल मीडियातून फिरत आहेत. भाजपचे वासुदेव काळे यांनी भीमा कारखान्यावर केलीली टीका व्हायरल झाली आहे.       

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. यातून सावरण्यासाठी मनसेच्या 'लावरे तो व्हिडीओ' या मोहिमेचा भाजपने मनसेवरच पलटवार केला आहे. राज ठाकरे यांच्या यापुर्वीच्या वादग्रस्त क्लिपचे भाजपने संकलन करून ते व्हायरल केले आहेत. भाजपने 'लावरे हा व्हिडीओ' असे या मोहिमेला नाव दिले. या क्लिपने मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या व्हायरल क्लिपमुळे मनोरंजन झाले का मतांवर त्याचा 
परिणाम झाला हे निकालानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान सोशल मीडीयातील 'युद्धात' भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clips get viral of indapur rally