LokSabha2019 : काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर बहुसंख्य मताने विजयी होणार - जोशी (व्हिडीओ पहा)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुण्यातील लोकसभेची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुसंख्य मताने विजयी करतील याची मला पुर्ण खात्री आहे.
- मोहन जोशी, लोकसभा उमेदवार काँग्रेस

पुणे : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे सर्व उमेदवार बहुसंख्य मताने निवडूण येणार आहेत. अशा विश्वास पुण्यातील आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केला. पुण्यातील उमेदवाराची निवड झाल्यानंतर काँग्रेस भवनात आघाडीच्या सर्वपक्षीय बैठकीत जोशी बोलत होते. 

या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे शहारध्यक्ष रमेश बागवे, आमदार विश्वजित कदम, अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड, अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मोहन जोशींनी निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले. यावेळी जोशी म्हणाले, पुण्यासारख्या ऐतिहासीक शहरात काँग्रेस भवनात ही सभा होत आहे. जेधे, मोरे, गाडगीळ यांच्या नेतृत्त्वाखाली ही काँग्रेस पुण्यातल्या तळागाळातील माणसापर्यंत पोहचली. मला उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचे आभार, त्यांनी माझ्या सारख्या कोणतीही राजकिय पार्श्वभूमि नसलेल्या कार्यकर्त्याला निवडणूकीची संधी दिली. माझे सहकारी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड, अभय छाजेड यांनीही उमेदवारी मागीतली होती. परंतु, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने घेतलेला निर्णय अंतिम समजून सर्वांनी तो मान्य केला आहे. आम्ही सर्व भाजला हरविण्यासाठी लढणार आहोत. 

बुधवारी (ता.3)  बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा निवडणूक अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी  नरपतगीरी चौकात सर्वांनी उपस्थित रहावे, या ठिकाणी जाहीर सभा घेणार असल्याचेही जोशी म्हणाले.

पुण्यातील लोकसभेची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुसंख्य मताने विजयी करतील याची मला पुर्ण खात्री आहे.
- मोहन जोशी, लोकसभा उमेदवार काँग्रेस

Web Title: Congress and NCP party workers will be won by majority vote Joshi