Loksabha 2019 : 'काँग्रेसने पैसे घेऊन उमेदवारी दिली'

Loksabha 2019 : 'काँग्रेसने पैसे घेऊन उमेदवारी दिली'

नागपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हतबल झाल्याचे दिसत असताना येथे पक्षाने आर्थिक व्यवहारातून उमेदवारी दिली, असा गंभीर आरोप मतदारसंघातील यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

पक्षाने घोषित केलेला उमेदवार विनायक बांगडे हे सक्षम नसल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वणी तालुका कॉंग्रेस समितीने प्रदेश कॉंग्रेस समितीकडे केली होती. पण, प्रदेश आणि केंद्रीय समितीने विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने धानोरकर यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी एकत्र येऊन चंद्रपूरच्या उमेदवारीत आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला.

रविवारपर्यंत (ता. 23) धानोरकर यांना उमेदवारी घोषित न केल्यास वणीतील सर्व पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, तालुकाध्यक्ष विवेक मांडवकर यांनी सांगितले. कॉंग्रेसकडून डावलले गेल्याने धानोरकर यांना प्रहार जनशक्ती पक्षाने लढण्याचे खुले निमंत्रण दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com