Loksabha 2019 : गौतम गंभीर आता भाजपकडून खेळणार

gautam gambhir
gautam gambhir

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आज (ता. 22) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये त्याला दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणूकीतील पहिले मतदान 11 एप्रिलला होणार आहे आणि निकाल 23 मे ला जाहीर केले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. 

काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत असलेले क्रिकेट संदर्भातील सगळे संबंध तोडून टाकण्याचे मत त्याने व्यक्त केले होते. जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडकात अंतिम सामना जरी पाकिस्तानविरुद्ध असला तरी खेळू नका असे वक्तव्य त्याने केले होते आणि त्यामुळेच तो सध्या खूप चर्चेत आला आहे. तसेच तो सध्या सामाजिक कार्यातही पुढाकार घेताना दिसतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com