Loksabah 2019 : पालघरमध्ये पैसे वाटल्याचा सेना आमदाराविरुद्ध गुन्हा

shivsena
shivsena

मुंबई : पालघर जिल्ह्यातील तुळींज भागात शिवसेना कार्यालयाबाहेर थांबलेल्या वाहनातून 64,500 रूपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज जप्त केली. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे कार्यालय या भागात आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्यांसह वसई विरारचे महापौर रुपेश जाधव यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटले जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. 

या तक्रारीनंतर आयोगाच्या पथकाने गावीत यांच्या कार्यालयाबाहेरील वाहनांची तपासणी केली. एका वाहनात 64,500 रूपयांची रोकड सापडली. तपासणीवेळी कार्यालयात शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केल्याचे आयोगाच्या अधिकाऱयांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com