मुंबई : यंदा निवडणूक ही विकल्पाची नाहीतर संकल्पाची निवडणूक आहे. गरिबांना सशक्त करून त्यांना नवी संधी देण्याची ही निवडणूक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सांगितले.
बांद्रा-कुर्ला येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित आहे. पंतप्रधान मोदींनी कसं काय मुंबई, सगळं काही ठिक आहे ना?, अशी मराठीत विचारपूस करून आपल्या भाषणाला सुरवात केली.
तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आपल्या भाषणात घेतले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.