Loksabha 2019 : पर्रीकरांच्या प्रचाराची उणीव मुख्यमंत्री काढताहेत भरून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पणजी : लोकसभा व तीन मतदारसंघातील विधानसभा निवडणूक आठवड्यावर आली असल्याने गोव्यात निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उणीव भरून काढण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रचारावेळी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढत आहे. पर्रीकरांची प्रचाराची अनुपस्थिती भासू न देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. 

भाजपचे सर्वच मंत्री व आमदार तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी निवडणूक प्रचारकार्यात गुंतली आहे. राज्यातील प्रशासनाचे काम बाजूला ठेवून पक्षाचा प्रचारात मुख्यमंत्री सावंत यांनी पूर्णपणे झोकून दिले आहे. मतदानापर्यंत त्यांच्या राज्यातील प्रचारसभा तसेच कोपरा बैठकांचे कार्यक्रम निश्चित असून सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्यांच्या या प्रचार सभा सुरू आहेत.

गोव्याचे पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनीही काही सभांमधून भाजपचे कार्य लोकांसमोर ठेवताना विरोधकांविरुद्ध सडतोड आरोप करण्यापासून मागे राहिलेले नाहीत. राज्यात विविध पक्षांतर्फे निवडणूक प्रचार होत असला तरी भाजप नियोजनबद्ध निवडणूक प्रचार कार्यक्रम पार पाडण्यात इतरांपेक्षा खूपच पुढे आहे.

Web Title: election rallies by chief minister by Goa Pramod Sawant