ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 25 मार्च 2019 चा #ElectionTracker

मायावती 
देशाला लागलेला गरिबी आणि बेरोजगारीचा शाप हा काँग्रेस आणि भाजपने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम आहे. ही समस्या 'हर हाथ को काम' या बसपच्या इच्छाशक्तीमुळेच दूर होऊ शकते. माझ्या काळात उत्तर प्रदेशमधील सर्व सामन्य जनतेला रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला होता.  

अखिलेश यादव 
'विकास' विचारतोय... भाजप आपल्या प्रचारसभांमध्ये विरोधी पक्षांवरच का बोलत आहेत? भाजपच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात एकही सकारात्मक काम झाले नाही का? जनतेचा आक्रोश आणि हारण्याच्या भीतीने भाजपचे नेते आणि कार्यकर्ते गर्मी वाढल्याचे नाटक करून निवडणूक प्रचारापासून पळ काढत आहेत.

प्रियंका गांधी
मी लखनऊ मधील काही शिक्षकांना भेटले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दरमहा मिळणाऱ्या 8 हजार 470 रुपये वेतनामध्ये वाढ करून 17 हजार रुपये केले जातील. मात्र, आजपर्यंत त्यांना 8 हजार 470 रुपये मीळत आहेत. सरकारच्या खोट्या प्रचाराच्या गाज्यावाज्यात शिक्षकांचा आवाज हरवला आहे.

Web Title: Election Tracker Today Quotes Of Akhilesh Yadav priyanka gandhi Mayawati