Election Tracker : आज काय म्हणाले, देशातील महत्त्वाचे राजकीय नेते?

टीम ई-सकाळ
मंगळवार, 16 एप्रिल 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!
हा आहे 16 एप्रिल 2019 चा #ElectionTracker

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!
हा आहे 16 एप्रिल 2019 चा #ElectionTracker

पंतप्रधान नरेंद्र मोदी

'तुमचा हा चौकीदार देशातल्या गरिब जनतेला पक्की घरं देण्यासाठी प्रयत्न करतोय. जिथे की काँग्रेसचे नेते मोठमोठी फार्महाऊस बांधत आहेत. काँग्रेसने सामाजातल्या एका मोठ्या वर्गाला चोर म्हणून संबोधले आहे. या वक्तव्यासाठी काँग्रेसला जनता माफ नाही करणार. काँग्रेसच्या ढकोसलापत्रातून हिंसा आणि दहशतवाद पसरवणारी शक्ती उड्या मारत आहे. काँग्रेसला तुम्ही देशाच्या सुरक्षेशी खेळू द्याल?'

- कोरबा व भटपारा (छत्तीसगड) येथील सभेत

 

अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेसचे सरकार विश्वासघातकी. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासनांची पूर्तता करण्यास अपयशी ठरले आहेत. त्यांनी 48 हजार कोटी रुपयांचे कर्जमाफीचे आश्वासनं दिले होते. मात्र, त्यांनी फक्त 1500 कोटींची कर्जमाफी केली आहे.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बायको मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचे मोल कसे समजणार अशी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रातील अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर बोलताना पवार कुटुंबाला लक्ष केले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना पवारांनी दुसऱ्यांदा मोदींवर हल्ला चढवला. 'माझ्या घरात मुलगी, पत्नी, नातेवाईक असे सर्वजण आहेत. आमचं मोदींसारखं नाही. त्यांच्या घरात कोणीच नसल्यानं त्यांना कुटूंब चालवण्याचा अनुभव नाही. त्यामुळेच दुसऱ्यांच्या कुटूंबात नाक खुपसणं बंद करा,' असा सल्ला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिला.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Tracker Today Quotes Narendra Modi Amit Shah Sharad Pawar