Loksabha 2019 : राजू शेट्टींना लढण्यासाठी शेतऱ्यांची मदत 

raju-shetti
raju-shetti

कऱ्हाड - खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचाराच्या प्रारंभाच्या सभेत स्वाभिमानीचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकडून जमा केलेल्या एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश लोकसभा निवडणुकीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे सुपुर्द केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार ते पाच वर्षापासुन विविध आंदोलनाव्दारे सातारा जिल्ह्यामध्ये शेतकरयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातुन अनेक प्रश्नही मार्गी लागले आहेत. खासदार शेट्टी यांना त्यांच्या मतदार संघातुन एक नोट-एक वोट देवून जनतेतुन निवडून देतात. त्या उपक्रमांतर्गत त्यांना मतदार संघाबाहेरुनही मदत केली जाते. त्याचाचे एक भाग म्हणुन स्वाभिमानीचे जिल्ह्याध्यक्ष नलवड़े व त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्ह्यात खासदार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून ऊस दर, दूध दर, रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रश्न, पाणी प्रश्न, पुनर्वासनाचा प्रश्न, विजेचा प्रश्न असे अनेक शेतकऱ्यांशी व सर्वसामान्य लोकांशी निगडित प्रश्न मार्गी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खासदार शेट्टी यांना निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातुन एएक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये जमा केले. त्याचा धनादेश जिल्हाध्यक्ष नलवडे यांनी खासदार शेट्टी यांच्याकडे सुपुर्द केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com