Loksabha 2019 : स्मृती इराणी यांच्या विरोधात खटला दाखल 

smriti_Irani.jpg
smriti_Irani.jpg

पुणे : अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवीत असलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. 2004 आणि 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

इराणी या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. इराणी यांनी 2004 साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या विरोधात दिल्लीतील चांदणी चौक मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण बीएपर्यंतचं शिक्षण घेतल्याचे शपथेवर प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र 2019 ची लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण बीएच्या प्रथमवर्षापर्यंतच शिक्षण घेतल्याचे नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकारी बी. स गायकवाड यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली पाटील यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा खटला दाखल केला. लवकर न्यायालय याबाबत आदेश देण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com