Loksabha 2019 : काँग्रेसला मोठा दणका; कट्टर मोदीविरोधक हार्दिक पटेलवर निवडणूक बंदी!

Loksabha 2019 : काँग्रेसला मोठा दणका; कट्टर मोदीविरोधक हार्दिक पटेलवर निवडणूक बंदी!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच हार्दिक पटेल काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक  लढविणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता न्यायालयाने त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

2015 मध्ये मेहसाणातील भाजप कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. पटेल यांनी सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे न्यायालयाच्या नियमानुसार, ज्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा झाली, अशी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. त्यानुसार गुजरात न्यायालयाने हार्दिक पटेल यांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे.

दरम्यान, हार्दिक पटेल गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती काँग्रेसकडून यापूर्वी दिली गेली होती. मात्र, न्यायालयाच्या या निकालानंतर आता हार्दिक पटेल निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com