Loksabha 2019 : देशात आता परिवर्तन होणे गरजेचे : उदयनराजे

Loksabha 2019 : देशात आता परिवर्तन होणे गरजेचे : उदयनराजे

सातारा : 'मेक इन इंडिया'च्या नावाखाली त्यांनी 'मेक इन' नाही तर 'ब्रेक आवर इंडिया' असे काम केले आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीकडे एक चळवळ म्हणून पाहून भाजप सरकारने घेतलेल्या अन्यायकारण निर्णय बदलण्यासाठी देशात परिवर्तन होणे गरजेचे आहे. ते केवळ देशातील व राज्यातील तुम्ही मतदारच करू शकता, असे आवाहन साताऱ्याचे आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कऱ्हाडातील जाहीरसभेत केले. 

काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) कऱ्हाडात सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषेदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जोगेंद्र कवाडे, हसन मुश्रिफ, विक्रमसिंह पाटणकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, सुमन पाटील, प्रभाकर घार्गे, इंद्रजित मोहिते, सत्यजित पाटणकर, देवराज पाटील आदी उपस्थित होते. 

उदयनराजे भोसले म्हणाले, लोकशाही आहे, आपण सर्वांनी मान्य केलेली आहे. लोकशाहीत दर पाच वर्षांनी निवडणुकीची प्रक्रिया चालू असते. मात्र, ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात. नेमके आपण निवडणुकीच्या काळात मतदान कोणाला आणि का करायचे. व्यासपीठावर उपस्थित आहेत, ते एका विशिष्टविचारांनी उपस्थित आहेत. ज्यावेळी लोक एका विचाराने एकत्र येतात. त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कुठल्या ताकतीची गरज लागत नाही. स्वार्थासाठी एकत्र येतात आणि स्वार्थ साधल्यानंतर वेगवेगळ्या वाटेने जातात. पाच वर्षांपूर्वी निवडणुका जाहीर झाल्या. अत्यंत चांगल्या पध्दतीने लोकांची दिशाभूल केली गेली. सोशल मीडियाचा वापर करून एकप्रकारे लोकांशी दिशाभूल केली की आपले कोण कल्याण करू शकत असेल तर हेच करू शकतात.

वाटेल ती आश्‍वासने या लोकांनी दिली. या आश्‍वासनांना जनता बळी पडली. ज्या तळमळीने ते बोलले, त्या पाच वर्षांच्या कालावधीत अवस्था पाहिली तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची तर त्यांना सोयीनुसार विसरल पडली. पाच वर्षांत अन्यायकारक निर्णय घेतले. लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचे काम केले. दररोज रेडीओवर मनकी बात ऐकायला मिळायची. आमचे सरकार आले तर गरीबांच्या खात्यात 15 लाख जमा करू, शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू, दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, सगळ्यांनी ऐकले आणि मतदान केले.

काय मिळाले, इल्ला. ही झाली त्यांची मन की बात. आपण सर्व एका समाजातील घटक आहोत. लोकांची मनकी बात काय आहे, हे मी जाणून घेतले आहे. 'मेक इन इंडिया'अंतर्गत त्यांनी मेक नाही. ब्रेक आवर इंडिया असे केले. निवडणुकीकडे चळवळ म्हणून पाहा. उदयनराजेंना निवडून द्यायचे म्हणून नाही. इतका संकुचित विचार करू नका. स्वत:चा विचार करा, असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, त्यांनी राबविलेली ध्येय धोरणे पाहता त्यांनी घेतलेले निर्णय मागे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे समर्थन करणे हाच पर्याय आहे. आता संपूर्ण देशभरात परिवर्तन करणे गरजेचे आहे. त्यांनी घेतलेले अन्यायकारक निर्णय मागे घेण्यासाठी सत्तांतर करणे गरजेचे आहे. ते आता तुमच्या हातात आहे. शेतकऱ्याची अवस्था बदलायची असेल तर सर्व तुमच्या हातात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com