Loksabha 2019 : ईव्हीएमवरून विरोधीपक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात?

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) मुद्यावरून विरोधी पक्षांची झाली बैठक.

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) मुद्यावरून विरोधी पक्षांची आज (रविवार) बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ईव्हीएमसोबत 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा केली जाणार आहे, असे विरोधी पक्षांनी सांगितले. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची काल (शनिवार) भेट घेतली. यावेळी त्यांनी ईव्हीएमसोबत छेडछाड होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आज राजधानी दिल्लीत याच मुद्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये 50 टक्के पेपर ट्रेलची ईव्हीएमसोबत पडताळणी करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाणार असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. देशातील 21 राजकीय पक्षांनी 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणीची मागणी केली असल्याचेही काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

दरम्यान, कोणत्याही पडताळणीशिवाय लाखो मतदारांची नावं ऑनलाईन प्रणालीद्वारे यादीतून काढून टाकण्यात आले. याची मोठी यादी पक्षाने निवडणूक आयोगाला दिली आहे, असेही सिंघवी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Issue of EVM Opposition Party will go to Supreme Court