Loksabha 2019 : आझमजी, मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार आहे का?: जयाप्रदा

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

आझम खान यांनी एका प्रचारसभेत बोलताना जयाप्रदा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आसून, महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. 

रामपूर (उत्तर प्रदेश) : 'समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. माझ्यासाठी हे नवीन नाही. मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते, तेव्हाही त्यांनी माझ्याबद्दल असे अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मी एक महिला आहे. ते काय बोलले हे मी सर्वांसमक्ष नाही सांगू शकत. त्यांचे असे बोलणे नेहमीचे आहे,' असा आरोप जयाप्रदा यांनी आझम खान यांच्यावर केला. 

त्यांच्या वक्तव्यानंतर जया प्रदा अत्यंत संतप्त झाल्या होत्या. मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार आहे का? असा संतप्त सवाल जया यांनी केला. खान यांना निवडणूक लढण्यासाठी परवानगी देऊ नये, असे लोक असतील कर लोकशाहीचे काय होईल, महिला सुरक्षित राहणार नाहीत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मी रामपूर सोडून निघून जाईन असे वाटत असेल तर तसे अजिबात नाही, मी रामपूर कधीच सोडणार नाही असेही जया यांनी सांगितले.    

आझम खान यांनी एका प्रचारसभेत बोलताना जयाप्रदा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आसून, महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. 

मी त्यांचे नाव घेऊन काहीही बोललो नाही, त्यांनी मला तसे पुरावे दाखवून द्यावेत. मी मंत्री आहे, त्यामुळे मला काय बोलायचे आणि काय नाही हे कळते, मी मर्यादा सोडून बोललो असल्याचे सिद्ध केल्यास मी उमेदवारी सोडून देईल असे वक्तव्य आझम खान यांनी केले. 

उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघात सपाचे उमेदवार आझम खान यांच्याविरूद्ध भाजपकडून अभिनेत्री जयाप्रदा रिंगणात आहेत. 

Web Title: JayaPrada responds on statement by Azam Khan at Rampur