Loksabha 2019 : म्हापशातून जोसुआ डिसोझा यांनाच भाजपची उमेदवारी

josua
josua

पणजी : भाजपने म्हापसा विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचे पूत्र जोसुआ यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. फ्रांसिस यांच्या निधनामुळे ती जागा रिक्त झाली आहे. गेली 27 वर्षे फ्रान्सिस हे म्हापशाचे आमदार होते.

फ्रान्सिस यांच्यामुळे म्हापशातून भाजपच्या अन्य नेत्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी न मिळाल्याने अनेकांना म्हापशातून भाजपकडून लढण्याची इच्छा होती. म्हापशाचे माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वीय सचिव रुपेश कामत यांचा त्यात वरचा क्रमांक होता. भाजपच्या प्रदेश निवडणूक समितीनेही कांदोळकर व जोसुआ यांची नावे उमेदवारीसाठी विचारात घेतली होती. मात्र फ्रांसिस यांना मानणारा मोठा वर्ग म्हापशात होता. गोव्यातील छोट्या आकाराच्या मतदारसंघातही ते 9 ते 20 हजार मतांच्या मताधिक्याने सहज विजयी होत असत. मागच्या निवडणुकीवेळी तर ते प्रचाराला सुद्धा गेले नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांच्या मतांचा विचार करून सध्या म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक असलेले त्यांचे पूत्र जोसुआ यांनाच उमेदवारी दिली आहे.

जोसुआ यांनी आपल्या पित्याचा वारसा पुढे चालवावा असे आवाहन फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केले होते. त्यानंतर जोसुआ यांनीही आपण हा वारसा पुढे चालवणार असे जाहीर करत भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. जोसूआ यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यास इतर पक्ष त्यांना उमेदावारी देण्यासाठी तयार होते. त्यातच उपसभापती मायकल लोबो यांनीही जोसुआ यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास उत्तम असे सुचवले होते. या साऱ्याचा एकत्रित परीणाम म्हणून म्हापशात डिसोझा परीवाराकडेच भाजपचे नेतृत्व ठेवण्याचा भाजपने दिल्लीत निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com