कारणराजकारण : आळेफाटा येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न; आढळरावांनी कामे केल्याचा कार्यकर्त्यांचा दावा

शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शिरूर लोकसभा मतदारसंघातील आळेफाटा हे महत्वाचे आणि राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्राबल्य या भागात जाणवते. येथे वाहतूक कोंडी सोबतच अनेक प्रश्न आहेत असे  इथल्या काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आळेफाटा (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील आळेफाटा हे महत्वाचे आणि राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्राबल्य या भागात जाणवते. येथे वाहतूक कोंडी सोबतच अनेक प्रश्न आहेत असे  इथल्या काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांनी ही गोष्ट खोडून काढताना आढळरावांनी मतदारसंघात आणि आळेफाटा भागात मोठी विकासकामे केली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, येथे पाणीप्रश्न, बसस्थानकाचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.

Web Title: KaranRajkaran discussion with aalephata villagers