कारणराजकारण : कोल्हे, आढळरावांसाठी कार्यकर्ते आमने सामने

शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शिरूर लोकसभा मतदारसंघातील घोडेगाव हे आंबेगाव तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे या भागात प्राबल्य असून दोन्ही पक्षाचे समर्थक आज राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार खा. आढळराव पाटील यांच्यासाठी आमने सामने आले होते.

घोडेगाव (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील घोडेगाव हे आंबेगाव तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे या भागात प्राबल्य असून दोन्ही पक्षाचे समर्थक आज राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार खा. आढळराव पाटील यांच्यासाठी आमने सामने आले होते.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आढळराव यांची बाजू मांडताना त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला तर, गेल्या पंधरा वर्षांत विद्यमान खासदारांनी मतदारसंघाची वाट लावली असून डॉ. अमोल कोल्हे हे सुशिक्षित उमेदवार असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने ही जागा पक्की झाली असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

आढळराव यांची बाजू मांडताना त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की, आढळराव यांच्या कमासोबताच युती सरकारने केलेली कामे आणि आखलेली धोरणे योग्य होतो आणि त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरेल. शेवटी चर्चा संपत आल्यावर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर आहेच्या घोषणा दिल्या तर युतीच्या समर्थकांनी हर हर मोदी घर घर मोदीच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.

Web Title: Karanrajkaran discussion between amol kolhe and shivajirao adhalrao patilm supporters at ghodegaon