कारणराजकारण : इंदापूरमधील आमदारांच्या गावाचा कल कोणाकडे? (व्हिडिओ)

बुधवार, 10 एप्रिल 2019

विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे सध्या विद्यमान आमदार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत असं सांगितलं जात आहे.

इंदापूर : विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे सध्या विद्यमान आमदार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत असं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांमध्ये दिलजमाई झाली असून या वेळेस कार्यकर्तेही एकदिलाने काम करतील असं सध्या सांगितलं जात आहे, मात्र असं असलं तरी कार्यकर्ते कितपत एकदिलाने काम करतील याबाबत शंका वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर इंदापूर विधानसभा मतदारसंघात भाजप समर्थकांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला असून फडणवीस यांनी या मतदारसंघावर स्वतंत्रपणे लक्ष घालून विकास कामांवर भर दिला असल्याचं इथल्या भाजप समर्थकांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर, वंचित बहुजन आघाडीचेचेही समर्थक या मतदारसंघात आहेत. ते संविधान, लोकशाही आदी मुद्द्यांवर तिथे बोलताना दिसून येतात.

दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना 22 ते 24 हजार मतदान ची लिंक दिली होती यावेळी ते मताधिक्य किती टिकून राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: KaranRajkaran Discussion with BJP, NCP and Congress Party workers at Indapur