कारणराजकारण : पाणी आहे, पण रेशन नाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच  मिळत नाही,  गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील  केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला.  ​

पुणे : पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच  मिळत नाही,  गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील  केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला.  

कोथरूड मध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, पीएमपीने प्रवास करताना वृद्धांना जागा मिळत नाही, कोणी जागाही देत नाहीत. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.  युवकांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे.  रोजगार देण्यात हे सरकार फेल झाले असून,  केवळ जोरात जाहिरातबाजी सुरू आहे. त्यामुळे आता सत्ता परिवर्तन झाले पाहिजे.  

झोपडपट्टी पुनर्वसन करताना १२, १४ मजली इमारत बांधु नये.  जास्तीत जास्त ७ मजल्यावर मजल्यापर्यंत बांधकाम करावे. स्थानिक नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत, पण केंद्राच्या योजना पोहचत नाहीत,  असे नागरिकांचे म्हणने आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KaranRajkaran discussion with citizens of kelewadi pune