कारणराजकारण : आढळरावांनी पाच वर्षात 27 कोटींची कामे केली; कार्यकर्त्यांचा दावा (व्हिडिओ)

शुक्रवार, 12 एप्रिल 2019

खासदार आढळराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शिरूर मतदारसंघात 27 कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा आढळरावांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याचे पुरावेही असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधक मतदारसंघाचा विकास झाला नसल्याचा आरोप आढळराव यांच्यावर करीत आहेत.​

पुणे : खासदार आढळराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शिरूर मतदारसंघात 27 कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा आढळरावांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याचे पुरावेही असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधक मतदारसंघाचा विकास झाला नसल्याचा आरोप आढळराव यांच्यावर करीत आहेत.

'कारणराजकारण' या सकाळच्या उपक्रमांतर्गत 'सकाळ'च्या टिमने आढळरावांच्या निवास्थानी कार्यकर्त्यांशी आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी लाईव्ह गप्पा मारल्या. त्यावेळी आढळराव यांनी केंद्र सरकारकडून मतदारसंघात रस्ते, पायाभूत सुविधा यासाठी भरघोष निधी आणला. तसेच पुणे-नाशिक महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम आणि लोहमार्गचे काम, अष्टविनायक मंदिराचा विकास ही कामे मंजूर करुन आणली, असा दावा कार्रकर्त्यांनी केला.

सकाळची टिम आढळराव पाटील यांच्या घरी गेली तेव्हा, सर्वत्र कार्यकर्त्यांची लगबग दिसत होती. प्रचाराची सर्व सtत्र याच ठिकाणावरुन हलवली जात होती. तसेच सोशल मीडियाची मोठी टिमही आढळराव यांच्या प्रचारात उतरलेली आहे. आढळराव प्रचारामध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याशी चर्चा करता आली नाही. त्याच्यावतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आढळराव यांची बाजू मांडली.

Web Title: KaranRajkaran discussion with supporters of Shivajirao Adhalrao Patil