कारणराजकारण : बारामतीतल्या तरुणाईला राजकारणाविषयी काय वाटतं? (व्हिडिओ)

बुधवार, 10 एप्रिल 2019

बारामती मतदारसंघात आम्ही जाणून घेतलं, तिथल्या तरूणाईच्या मनात राजकारणाविषयी काय मत आहे... वाचा सविस्तर 

बारामती : बारामतीतल्या तरुणाईला राजकारणाविषयी काय वाटतं हे जाणून घेत असताना लक्षात येतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे इथल्या तरुणाईसाठी महत्वाचे नेते आहे.

इथली मुलं राजकारणाविषयी बोलतात. राजकारणाविषयी बोलत असताना ही मुलं राहुल गांधी, नरेंद्र मोदी या राष्ट्रीय नेत्यांबरोबर अरविंद केजरीवाल, मायावती, सचिन पायलट यांच्याविषयी बोलतात आणि वाचतात.

अडचणी व प्रश्नांवर बोलायचे झाल्यास मुलींना आजही वाटते की मोठ्या प्रमाणावर महिलांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि सुटायला हवेत. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीकडून या दोन्ही पक्षांकडून महिला उमेदवार रिंगणात आहेत पण इथली तरुणाई आणि मुली या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाहीत.

Web Title: KaranRajkaran discussion with youngsters in T C College Baramati