Loksabha 2019 : किरीट सोमय्या अद्यापही 'गॅस'वरच!

Loksabha 2019 : किरीट सोमय्या अद्यापही 'गॅस'वरच!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह अनेकांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, ईशान्य मुंबईतून इच्छुक असलेले विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना अद्याप उमेदवारी दिली गेली नाही.

ईशान्य मुंबई मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार असेल हेही ठरले आहे. मात्र, ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना पुन्हा खासदारकीचे तिकीट देण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचेही समोर आले आहे. या घडामोडींमुळे भाजपने ईशान्य मुंबई संदर्भातील तपशील जाहीर करणे टाळले आहे. किरीट सोमय्या यांना स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सोमय्या यांनी मतदारसंघामध्ये भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. त्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सोमय्या यांना विरोध नसल्याचेही संकेत मिळाले होते. 

दरम्यान, 'मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान सोमय्या यांनी 'मातोश्री'वरच आरोप केले होते. त्यामुळे आमच्यावर कारवाई करा; पण लोकसभेमध्ये आम्ही सोमय्या यांचा प्रचार करणार नाही', अशी भूमिका या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतली होती. यासंदर्भात अनेकांनी ठाकरे यांची भेटही घेतली होती. त्यातूनच आता ईशान्य मुंबईसाठी उमेदवारी न दिली गेल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com