Loksabha 2019 : पहिल्यांदा मतदान करताय, मग हे वाचाच!

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

- नवमतदारांसाठी आहेत या महत्त्वाच्या गोष्टी.

- काय करावे अन् काय करू नये, याचाही आढावा.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीचे पहिल्या टप्प्यासाठी उद्या (ता.11) मतदान होणार आहे. देशातील 18 राज्य आणि 2 केंद्रशासित राज्यांमध्ये लोकसभेच्या 91 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत.

नवमतदारांच्या मनात मतदानाबाबत उत्सुकता निर्माण झालेली असेलच. तसेच पहिल्यांदा मतदान करताना अनेक समज-गैरसमजही निर्माण झाले असतील. तर या सर्व बाबी लक्षात घेऊन काय काळजी घ्यायची? याबाबतची सविस्तर माहिती :

- मतदान केंद्राची माहिती :

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या मतदान केंद्राची माहिती घेऊ शकता येते. त्या संकेतस्थळावरून तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह (सीईओ) विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळू शकतील. तसेच निवडणूक आयोगाने जारी केलेल्या व्होटर स्लिपच्या माध्यमातूनही मतदान केंद्राची माहिती मिळू शकते.

- मतदान केंद्रावर गेल्यानंतर :

मतदान केंद्रावर गेल्यानंतर विविध पक्षांचा स्वतंत्र डेस्क असेल. कोणत्याही डेस्कवर जाऊन मतदार यादीतील नाव पाहू शकता. नाव सापडल्यानंतर मतदान कोणत्या ब्लॉकमध्ये (खोली) करता येईल, हे समजेल.

- ईव्हीएमवरून करा मतदान :

त्यानंतर तुमच्या बोटाला शाई लावण्यात येईल. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर मतदान कक्षात ईव्हीएम मशिन दिसेल. त्यानंतर ज्या उमेदवाराला आपण मत देऊ इच्छिता त्यांच्या नाव आणि चिन्हासमोरील बटण दाबा. त्यानंतर लगेचच पुढे न जाता आपण दिलेले मत जाणून घेण्यासाठी व्हीव्हीपॅट मशिनवरून याचे पुन्हा पडताळणी करता येऊ शकेल.

Web Title: Know Full Process of Voting while Going To Vote First Time