Loksabha 2019 : महाराष्ट्रातून भाजपचे उमेदवार जाहीर; ही पाहा यादी!

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मार्च 2019

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

रावसाहेब दानवे यांना जालना तर डॉ. सुजय यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली. याशिवाय डॉ. हिना गावित यांना नंदूरबार, डॉ. सुभाष भामरे यांना धुळे, रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर झाली. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमधून वर्धातून रामदास तडस, गडचिरोलीतून अशोक नेते, अकोलातून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर चंद्रपूरातून हंसराज अहिर, भिवंडीतून कपिल पाटील, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन, बीडमधून प्रीतम मुंडे, लातूरमधून सुधाकरराव श्रृंगारे तर सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: List of BJP Candidate from Maharashtra