कारणराजकारण : स्थानिक नेत्यांनी प्रश्न खासदारांपर्यंत पोहोचवावेत

टीम ई सकाळ
रविवार, 14 एप्रिल 2019

लोणावळा : ''खासदार हा जवळपास पाच ते सहा विधानसभा मतदारसंघासाठी असतो. त्याला सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नसते म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्या खासदारांपर्यंत पोहोचवायला हव्यात'' , असे मत सकाळच्या कारणराजकारण मालिकेत लोणावळ्याच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

''लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना सुविधा कमी पडतात. लोणावळ्यात व्यवसाय हा पर्यटकांवर अवलंबून असतो आणि पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. नेमके याच काळात वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. या कारणांनी पर्यटक नाराज होतो. परिणामी लोणावळ्यातील व्यवसायावर त्याचा परिणाम होतो'' ,असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

पर्यटकांच्या पार्किंगचा प्रश्न मिटल्यास इथली वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. पण वाहतूक समस्येवर कोणाला लक्ष द्यायचे नाही. जेवढ्या प्रमाणात प्रशासन इथल्या समस्यांना कारणीभूत आहे. तेवढेच लोकही जबाबदार आहेत. तसेच, पाण्याचा प्रश्न आहे. इथे वर्षानुवर्षे दूषित पाणी प्यावे लागते. जल शुद्धीकरण प्रकल्प कित्येक दिवसापासून बंद आहे. तो चालू करण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्नशील असायला हवे, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे

Web Title: Local leaders should ask questions to the MPs