Loksabha 2019 : माकपतर्फे दिंडोरीतून जीवा पांडू गावित 

Loksabha 2019 : माकपतर्फे दिंडोरीतून जीवा पांडू गावित 

नवी दिल्ली : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी घोषित केली. राज्यातून दिंडोरी मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांचे एकमेव नाव या यादीत आहे. आजच्या 45 जणांच्या यादीत पश्‍चिम बंगाल व केरळमधून जाहीर केलेल्या प्रत्येकी 16 उमेदवारांत जुन्या-नव्यांचा संगम साधण्याचा प्रयत्न माकपने केला आहे. त्रिपुरातील दोन्ही उमेदवारही जाहीर करण्यात आले. 

माकपने यंदाही दिंडोरीच्या राखीव जागेवर लढण्याचा निर्धार केला आहे. भाजपचे ज्येष्ठ खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण सध्या खासदार आहेत. मात्र, सत्तारूढ पक्षाचे यंदा या मतदारसंघातही "भाकरी बदलण्या'चे मनसुबे आहेत. या आदिवासीबहुल मतदारसंघात भाजपच्या उमेदवारामोर गावित यांच्यासारखा अनुभवी मोहरा माकपने रिंगणात उतरविला आहे.

सोलापूरची जागा भाकपतर्फे लढविली जाण्याची चिन्हे आहेत. माकपच्या आजच्या यादीत राज्यासह हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना व पंजाबमधील प्रत्येकी एक, तमिळनाडू व आसाममध्ये प्रत्येकी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com