LokSabha2019 : महेशदादांकडून युतीधर्माचे पालन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

शिवसेनेचे शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या सरमर्थकांनी भोसरीत वियजी संकल्प मेळावा साजरा केला. या मेळाव्याला दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

भोसरी : एक मेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या दोन दादांचे भोसरीत मनोमिलन झाले. युतीधर्माचे पालन करण्यासाठी दोघेही एकत्र एकाच व्यासपीठावर आले. शिवसेनेचे शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या सरमर्थकांनी भोसरीत वियजी संकल्प मेळावा साजरा केला. या मेळाव्याला दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी या लोकसभा निवडणूकीत युतीधर्म पाळून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि आढळराव पाटील यांना चौथ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी हा विययी संकल्प मेळावा घेण्यात आला होता.

हे दोन्ही एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच आढळराव पाटल्यांच्या निवडणूक प्रचारापासून महेश लांडगे दुर होते. परंतु, दोघांमधील मतभेद बाजूला सारून युतीधर्माचे पालन करण्यासाठी दोन्ही नेते एकत्र आले. महेश लांडगे यांच्या जाहीर पाठींब्यामुळे शिरूर मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील यांची ताकत आणखी वाढणार आहे.

Web Title: Mahesh Landge and Shivajirao Adhalrao Patil come together for Election Campaign