Loksabha 2019 : पुण्यात मोहन जोशींच्या जाहीरनाम्याचे चौकीदाराच्या हस्ते प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज (ता. 16) पुण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सुरक्षित पुणे, हरीत पुणे, गतीमान पुणे, आनंदी पुणे या चतुःसूत्रीवर या जाहीरनाम्यात जोशी यांनी भर दिला आहे. तर प्रत्येक पुणेकराच्या मनातील पुणे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. 

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज (ता. 16) पुण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सुरक्षित पुणे, हरीत पुणे, गतीमान पुणे, आनंदी पुणे या चतुःसूत्रीवर या जाहीरनाम्यात जोशी यांनी भर दिला आहे. तर प्रत्येक पुणेकराच्या मनातील पुणे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. 

 

'हा फेकूनामा नाही. विजयी झाल्यानंतर प्रत्येक वर्षी समता भूमी येथे येऊन दिलेले आश्वासन पूर्ण केली, ते सांगणार. प्रत्येक घरात रोजगार देणार, तसेचं महिला, विद्यार्थी अशा घटकांचा विचारही जाहीरनाम्यात केला आहे,' असे जोशी यांनी सांगितले. तसेच पुणेकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले. 

मोहन जोशी यांनी सामान्य पुणेकराच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. एका खऱ्या चौकीदाराच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. पुण्यातील समताभूमी येथे त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 

Web Title: Manifesto published by Congress Candidate Mohan Joshi at Pune