LokSabha2019 : मोदींनी शेतकऱ्यांना पाच वर्ष एप्रिल फुल केले : दिलीप वळसे पाटील

दत्ता म्हसकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

जुन्नर : केंद्रातील सरकारने पाच वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता सर्वांना एप्रिल फुल केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाले असून आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रचार करावा असे आवाहन आमदार दिलीप वळसे पाटील यांनी येथे केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जुन्नर तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सोमवार ता.1 रोजी शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमाताई सावंत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, खजिनदार महेश ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार आणि जिल्ह्यातील व तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

सत्यशिल शेरकर म्हणाले, आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने प्रयत्न करतील. तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रचार केला जाईल.  

Web Title: Modi makes farmer april fool from last five years says Dilip Walse Patil