Loksabha 2019 : तुमच्या भावनांचा आदर करून भाजपमध्ये प्रवेश : रणजितसिंह

Loksabha 2019 : तुमच्या भावनांचा आदर करून भाजपमध्ये प्रवेश : रणजितसिंह

अकलूज : तुमच्या सर्वांच्या भावनांचा आदर करुन आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसह आपल्या भागाच्या विकासाच्या योजना मार्गी लागल्या पाहिजेत, यासाठी मी उद्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. अशी घोषणा माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली तर, रणजितसिंहांच्या भुमिकेला माझी सहमती आहे असे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. मोहिते-पाटील पितपुत्राच्या या घोषणेमुळे आज मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशावर आज शिक्कामोर्तब झाले.

यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेती, पाणी, कारखानदारी यासाठी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांनी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला. कॉग्रेस मध्ये वसंतदादा आणि सहकार महर्षिनी एका विचाराने केले. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तोच विकासाचा वारसा पुढे चालवला आहे. गेल्या पाच वर्षात खासदार विजयसिंहानी अनेक कामे मार्गी लावली. राष्ट्रीय महामार्ग, शंभर वर्षे रेंगाळलेला लोणांद पंढारपूर रेल्वेमार्ग त्यांच्यामुळे मंजूर होऊन त्यासाठी आर्थिक तरतुद झाली. सहा जिल्हे व ३१ तालुक्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना होणे गरजेचे आहे. ही योजना फक्त नरेंद्र मोदी पूर्णत्वाला नेऊ शकतात हा विश्वास आहे.  कार्यकर्त्यांची भावना आणि विकासाच्या योजना मार्गी लागाव्यात यासाठी मी भाजप प्रवेश करीत आहे असे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी उद्या दुपारी साडेबारा वाजता वेळ दिली आहे.

वानखेडे स्टेडियमजवळील गरवारे जिमखाना येथे मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे अवाहन त्यांनी यावेळी केली. त्यानंतर बोलताना खासदार मोहिते-पाटील यांनी रणजितसिंहांच्या भुमिकेला त्यांची सहमती असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com