Loksabha 2019 : डॉ. सुजय यांच्याविरोधात नगरमधून राहणार राष्ट्रवादीचा 'हा' उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज केली.

मुंबई : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत 17 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा पाटील यांनी आज केली. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतानाच संग्राम जगताप यांचा विजय निश्चित असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विचारांवर, त्यांनी तयार केलेल्या आघाडीवर विश्वास ठेवत असतील तर काँग्रेसचे लोक मदत करतील, असेही पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार प्रकाश गजभिये, मीडिया विभागाचे प्रमुख संजय खोडके उपस्थित होते.

Web Title: NCP candidate Sangram Jagtap will contest Election against Sujay Vikhe Patil