Loksabha 2019 : रावसाहेब दानवेंच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी घेतला होता आक्षेप

जालना : जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शैक्षणिक पात्रतेविरोधात आक्षेप घेतला होता. याबाबतचा अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित अर्ज शुक्रवारी (ता.पाच) फेटाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी हा आक्षेप दाखल केला होता.

वर्ष 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी दानवे यांनी 2011 ला पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले होते. तर यावेळी अर्ज दाखल करताना शैक्षणिक पदवी 2012 साली घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले. दानवे यांनी नेमकी कोणत्या वर्षी पदवी प्राप्त केली असा आक्षेप वानखेडे यांनी घेतला. शपथपत्रात नमूद माहितीबाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमचा नाही, असे सांगून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.

दरम्यान, वानखेडे यांनी याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे 'सकाळ'शी बोलताना सांगितले.  

Web Title: Objection Denies of Raosaheb Danves Nomination Form