Loksabha 2019 : देशात एकीकडे व्होटभक्ती तर दुसरीकडे देशभक्तीचे होतंय राजकारण : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

- भारतीय लष्कराने मागितली होती पाकिस्तानात घुसून कारवाई करण्याची मागणी.

पटणा : भारतीय लष्करातील जवानांनी तत्कालीन काँग्रेस सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली होती. मात्र, काँग्रेस सरकारने ती परवानगी दिली नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केला. तसेच देशात एकीकडे व्होटभक्तीचे राजकारण होत आहे तर दुसरीकडे देशभक्तीचे असेही ते म्हणाले.

बिहारच्या अररिया येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, 26/11 ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला याची आठवण करा. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी त्यावेळी काय केलं होतं? त्यावेळी जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकारकडून याबाबतची परवानगी दिली गेली नाही. त्यावेळी त्यांना मतांचे राजकारण करायचे होते. दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. असे असताना काँग्रेसने पाकिस्तानला शिक्षा देण्याऐवजी हिंदू लोकांना हिंदू दहशतवादी हा शब्द लावण्याचे षड्यंत्र केले, असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला.

दरम्यान, आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. दहशतवाद्यांना मारले म्हणून काँग्रेस नेत्यांच्या आता पोटात दुखत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

Web Title: One side politics of Votebhakti and another side patriotism says PM Modi