Loksabha 2019 : आयटी विभाग माझ्या घरावर छापे टाकणार - चिदंबरम

वृत्तसंस्था
सोमवार, 8 एप्रिल 2019

नवी दिल्ली : चिदंबरम यांनी ट्विट करून आयकर विभागाकडून होत असलेल्या धाडसत्रावर टीका केली आहे. तसेच शिवगंगा आणि चेन्नईमध्ये माझ्या घरावर देखील आयटी विभाग धाड टाकणार असल्याचे मला समजले आहे. असे त्यांनी ट्विट केले आहे. 

दरम्यान, निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीच धाड मारण्याचे षडयंत्र रचले जात असून, आम्ही या 'सर्च पार्टी'चे स्वागत करत आहोत, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली.

तसेच, आमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नसून, हे आयकर विभागालाही माहीत आहे. आयटी विभाग आणि इतर विभागांनी आमच्या घरी पूर्वीही छापे मारले आहेत. परंतु, त्यांना काहीच मिळाले नाही. केवळ निवडणूक प्रचारात अडथळे निर्माण करण्यासाठी आणि निवडणुकीवर परिणाम घडवून आणण्यासाठीच अशाप्रकारे धाड टाकण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  
 
Web Title: P Chidambaram claims IT raids being planned at his residence to cripple poll campaign