Loksabha 2019 : काँग्रेसच्या यादीमुळे 'राजी'पेक्षा नाराजीच जास्त!

Loksabha 2019 : काँग्रेसच्या यादीमुळे 'राजी'पेक्षा नाराजीच जास्त!

महाराष्ट्रात जास्तीतजास्त जागा जिंकणे आवश्‍यक असल्याचे हायकमांडने कळवले आहे. ओसाडगावातही पाटिलकी संपलेली नसल्याने आज दिवसभर नेत्यांध्ये कालीची रस्सीखेच सुरू होती. वर्धा लोकसभा मतदारसंघात तीन कॉंग्रेस आमदार असतानाही ही जागा राजू शेट्टींना द्यावी, असे प्रयत्न सुरू असल्याची कुणकुण लागताच माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण शब्दश: पळत पळत विमानतळावर पोहोचले अन् तेथून त्यांनी दिल्ली गाठली.

माजी प्रदेशाध्यक्ष तसेच शरद पवार विरोधक़ गटाच्या एकेकाळच्या म्होरक्‍या प्रभाताईराव यांची कन्या चारूलता टोकस या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर होणे, हे आपले कर्तव्यच असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी निकटवर्तीयांना हताश होवून सांगितले. शेट्टी यांनी आघाडीत राहावे याचीही जबाबदारी पृथ्वीराज यांनी स्वीकारली आहे.

मुंबईत वाद

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याऐवजी त्यांच्याच कन्या माजी मंत्री आणि अखिल भारतीय कॉंग्रेसच्या कमिटीच्या सचिव वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दयावीअसा प्रस्ताव होता. तरूणांना तसेच महिलांना संधी देण्याच्या पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आग्रहाशी तो सुसंगत होता. पहिल्या यादीत त्यामुळेच या मतदारसंघाचा समावेश झाला नाही. मात्र, अखेर ज्येष्ठांना संधी देत वयाचा मान राखला गेला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात मात्र रोहिदास पाटील या जुन्या जाणत्या चेहऱ्याऐवजी त्यांच्या मुलाला कुणालला संधी देण्यात आली आहे. वडील मुलासाठी आग्रही होते, असे समजते. मात्र, केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पाडण्याचे सार्थ्य असलेल्या डॉ. तुषार शेवाळे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी कॉंग्रेसमधील पदाचा राजीनामा दिला आहे.

शिर्डीत भाउसाहेब कांळे यांना संधी मिळाली आहे. ते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. ही जागा शेट्टींना सोडावी असाही एक़ प्रस्ताव होता. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी या जागेचे पालकत्व स्वीकारले आहे. विखे यांनाही आता कांबळेंसाठी मेहनत घेणे भाग ठरेल. नंदूरबारला डॉ. हीना गावित यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत उत्सुक होते. तेथे के. सी. पडवी यांना संधी दिली आहे. ही जागा कॉंग्रेसच्या क्रमांक एकच्या मानांकनात आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात डॉ.नीलेश राणे यांना बाहेरून समर्थन देण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्ताव धुडकावून लावत उदयोजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना संधी दिली आहे. आर्थिकबळ असलेले बांदिवडेकर गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात मेळावे घेत आहेत. 

माणिकरावांची सरशी 

विदर्भात शिवसेना लढत असलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याबद्दल नाराजी आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी शिवाजीराव मोघे किंवा यवतमाळची बांधणी करणारे स्व. उत्तमराव पाटील यांचे बंधू जीवन यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या एकमेव नावाची शिफारस दिल्लीला करण्यात आली होती. ते अशोक चव्हाण आणि विखे पाटील या दोघांच्याही जवळचे आहेत. मात्र, त्यांच्या मुलाला जिल्हा राजकारणात पत्करावी लागलेली हार बघता हा निर्णय काँग्रेसला कितपत फायद्याचा ठरेल याबददल शंका आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण की पत्नी अमिता हा नांदेडच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. अमिताभाभी उभ्या झाल्यास त्यांच्या विरोधात त्यांचीच भाचेसून मिलन पाटील खतगावकर यांना उमेदवारी देण्याचे वाटते आहे. भाजपचा हा डाव यशस्वी होईल, हे अशोकरावांच्या विरोधकांनी पटवून दिल्याने हा मतदारसंघ पेंडिंग ठेवला आहे.

राजीव सातव यांच्या हिंगोलीतील लढण्याच्या अनुत्सुकतेमुळे हा पेचही अद्याप सुटलेला नाही. नागपूरचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या विलास मुत्तेमवार यांचे नाव तेथे कापले गेल्याने त्यांचा मुलगा विशाल याला चंद्रपुरात संधी देणे विचारात आहे. तेथे सेनेचे बंडखोर आमदार तसेच भाजपचा त्याग केलेल्या आशिष देशमुख यांच्या नावाचाही विचार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com