Loksabha 2019 : पंतप्रधान मोदी तुम्हा-आम्हाला आवाहन करतायत.. प्रतिसाद देणार का?

Narendra_Modi
Narendra_Modi

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या विकासासाठी आपले एक-एक मत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठीही जनेतेला त्यांनी आवाहन केले आहे. यासोबतच त्यांनी ट्विटरवर दिग्गज मान्यवर, प्रमुख राजकारणी, मुख्यमंत्री, खेळाडू, कलाकार, पत्रकार, संगीतकार, अध्यात्मिक गुरू यांनाही मतदानाबाबत जागरूकता करण्यासाठी आवाहन केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन समाज पक्षाच्या मायावती, उ. प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, आण्णा द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन या सर्वांना टॅग करून मतदारांची संख्या वाढवण्याबाबत व मोठ्या प्रमाणात लोकांना मतदानास प्रवृत्त करण्याचे आवाहन मोदींनी या सर्व नेत्यांना केले आहे. तसेच भारतीयांनाही लोकशाहीसाठी मोठ्या संख्येने मतदान करा असे सांगितले आहे. 

सर्वानंद सोनोवाल, हेमंत बिस्व शर्मा, कॉनराड संगमा, निफ्यू रिओ, नवीन पटनाईक, एच. डी. कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू, जगन मोहन रेड्डी, नितीश कुमार, राम विलास पासवान, पवन चामलिंग, हरसिमरतकौर बादल, चिराग पासवान, आदित्य ठाकरे यांनाही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यास प्रवृत्त करा असे आवाहन मोदींनी केले आहे. 

कैलाश सत्यर्थी, किरण बेदी, सुदर्शन पटनाईक, तसेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, सद्गुरू, रामदेवबाबा यांनाही भारतातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले आहे.  

खेळाडूंनाही मोदी यांनी मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आवाहन केले आहे. यामध्येस अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, एम. एस. धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, नीरज चोप्रा, योगेश्वर दत्त, सुशीलकुमार, किदांबी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, फोगट भगिनी, बजरंग पुनिया यांना टॅग केले आहे. 

मान्यवर लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, ए. आर. रहमान यांनाही मोदींनी मतदानाची जागरूकता करण्यासाठी आवाहन केले आहे. अभिनेते आमीर खान, सलमान खान, शाहरूख खान, मोहनलाल, नागार्जून, अक्षय कुमार, रणवीर सिंग, वरूण धवन, विकी कौशल, आयुष्यमान खुराना, मनोज वाजपेयी, अभिनेत्री दीपिका पदुकोन, आलिया भट, अनिष्का शर्मा, भूमी पेडणेकर, संगीतकार शंकर महादेवन, निर्माता करण जोहर यांनाही मोदींनी मतदानाची जागरूकता करण्यासाठी आवाहन केले आहे.

उद्योगपती रतन टाटा, आनंद महिंद्रा, आशिष चौहान तसेच संघटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, ब्रम्हकुमारी यांनाही ट्विट करत मोदींनी आवाहन केले आहे.

पत्रकार रजत शर्मा, सुभाष चंद्रा, विनीत जैन, स्मिता प्रकाश, नविका कुमार, प्रसन्न विश्वनाथन, रूबिका लियाकत, अंजना कश्यप, सुधीर चौधरी, राहुल कनवाल, संजय गुप्ता, अरूण पुरी, राहुल जोशी यांनाही मोदींनी आवाहन करत मतदानाबाबत जागरूकतेसाठी टॅग केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com