Loksabha 2019 : देशभरातील कैदी मतदानापासून राहणार वंचित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

निवडणूक आयोगाची कैद्यांच्या बाबतीत मतदान करुन घ्यावे किंवा कैद्यांसाठी मतदान प्रक्रिया राबविणे याबाबत कुठलीही व्यवस्था नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देषामध्ये हे नसल्याने देशभरातील लाखो कैदी या मतदानापासुन वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बुलडाणा : संपूर्ण देशभरात मतदान जागृती मोहीम प्रशासनाकडून राबविली जात असताना या मतदान प्रक्रियेत देशासह राज्यातील सर्व कारागृहातील कैदी, बंदिस्त या मतदान प्रक्रियेत नसल्याची बाब समोर आली आहे. 

निवडणूक आयोगाची कैद्यांच्या बाबतीत मतदान करुन घ्यावे किंवा कैद्यांसाठी मतदान प्रक्रिया राबविणे याबाबत कुठलीही व्यवस्था नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देषामध्ये हे नसल्याने देशभरातील लाखो कैदी या मतदानापासुन वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
बुलडाणा कारागृह अधीक्षक संजय गुल्हाने यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सुद्धा तेच सांगितले, की निवडणूक आयोगाच्या कुठल्याही सूचना नसल्याने कैद्यांकड़ून मतदान करुन घेतले जात नाही.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी निरुपमा डांगे यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्देश पुस्तिकेकडे बोट दाखवले. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे देशातील सर्व कारागृहातील लाखो कैदी मतदानापासून वंचित राहणार, एवढे मात्र खरे.

Web Title: Prisoners in India will not br allowed indoor voting in this Loksabha 2019