LokSabha 2019 : बीडमधून पुन्हा डॉ. प्रितम मुंडे निवडणूकीच्या रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

बीड : बीड लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे पुन्हा खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना जाहीर झाली. गुरुवारी (ता. 21) भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत डॉ. मुंडे यांचे नाव आले. वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) आणि सौंदर्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी. डर्माटोलॉजी) असलेल्या डॉ. मुंडे वैद्यकीय व्यवसायात होत्या. मात्र, लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीत 2014 साली त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या.

दरम्यान, यावेळीही त्यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात होती. अगदी भाजपनेच एका संस्थेकडून पक्षाच्या आमदार/खासदारांच्या कथित पाहणीत खराब कामगिरी असलेल्यांच्या यादीत डॉ. मुंडे यांचे नाव असल्याची चर्चा होती. तेव्हाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉ. मुंडे यांनाच उमेदवारी असेल असे ठामपणे जाहीर सांगितले होते. तर, दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही डॉ. मुंडे यांच्या उमेदवारी बाबत शंका नसल्याचे सांगून उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान, पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यात प्रचाराची एक फेरी पूर्ण करून आता डॉ. मुंडेंनी दुसरी फेरीही सुरू केली आहे. बीड - नगर - परळी लोहमार्गाच्या कामाला भेटलेला मोठा निधी, केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली रस्ता कामे तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून आलेल्या विकास निधीच्या मुद्द्यावर त्या प्रचार करत आहेत.

Web Title: Pritam Munde again BJPs candidature from Beed