RahulWithSakal : तरुणांना नोकऱ्या देणे हाच सर्वोत्तम राष्ट्रवाद : राहुल गांधी (संपूर्ण मुलाखत)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

प्रश्‍न - मोदी राष्ट्रवादावर भर देत आहेत, त्याबद्दल आपल्याला काय वाटते?

उत्तर - आपल्या देशात नोकऱ्या निर्माण करण्यापेक्षा मोठा राष्ट्रवाद काय असू शकतो? आपल्या शेतकऱ्यांचे रक्षण करणे, तरुणांना नोकऱ्या देणे हाच सर्वोत्तम राष्ट्रवाद आहे. त्यांनी (मोदी यांनी) या संदर्भात काय केले आहे? बेरोजगारांची गेल्या ४५ वर्षांतली सर्वाधिक संख्या त्यांच्या सरकारच्या काळात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आधी कधीच नव्हते एवढे आहे, असे त्यांचेच सरकार म्हणत आहे. याची सगळ्यांनाच कल्पना आहे.

माझ्या मते भारतासमोरचे महत्त्वाचे प्रश्‍न म्हणजे शेतीचा प्रश्‍न, अर्थव्यवस्थेचा प्रश्‍न आणि बेरोजगारी. आणि राष्ट्रवादी असणाऱ्या प्रत्येकाने हे प्रश्‍न सोडवण्यासाठी त्याच्याकडून होतील ते प्रयत्न करायला हवेत आणि ते (मोदी) जर हे करू शकत नसतील, तर त्यांना अपयश का आले, हे त्यांनी संपूर्ण देशाला सांगायला हवे. भारत जर तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नसेल, आज देशात रोज २७ हजार नोकऱ्या जात आहेत, आणि चीन रोज ५० हजार नोकऱ्या नव्याने निर्माण करत आहे. भारत हा प्रश्‍न सोडवू शकला नाही, तर भारतासमोर एक मोठे संकट उभे राहील. राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्तींसमोर आज रोजगारनिर्मिती एवढे दुसरे कोणतेही महत्त्वाचे काम नाही. इथे मोदी पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत, अत्यंत वाईट, अपमानास्पद रीतीने अयशस्वी ठरले आहेत. अशा स्थितीत त्यांना राष्ट्रवादी म्हणता येणार नाही.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi opens up about nationalism in an exclusive interview with Abhijit Pawar