
देशातील दोन व्यक्ती बाजूला करण्याची गरज
आता देशातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यक्ती बाजूला करण्याची गरज आहे. त्यांच्याविरोधातच प्रचार केला पाहिजे. याचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना होऊ दे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खोटं बोलतात. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान कधी झालाच नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) मोदींवर निशाणा साधला. तसेच प्रथमसेवक म्हणा, असे नेहरुंचे वक्तव्य होते. आता त्यांची कॉपी ते करत आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबई येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकची कारवाई केली. त्यानंतर युद्धाची भाषा केली जात होती. मात्र, युद्धाची भाषा करता तर तुमच्याकडे आता पैसे कुठं आहेत?, असा सवाल यावेळी उपस्थित केला.
तसेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर जे चित्र उभं केले गेले ते खोटं होते. माणूस बदलला म्हणून आता माझी भूमिका बदलली. मी आधी बरं बोललो आता वाईट बोलत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. 2015 पासून आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
दरम्यान, अजित पवार, शरद पवार यांच्याबाबत मोदींनी 2014 च्या निवडणुकांपूर्वी केलेल्या विधानाची चित्रफित यावेळी दाखवली. शरद पवार यांच्याबाबत मोदींनी केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केले.
देशातील दोन व्यक्ती बाजूला करण्याची गरज
आता देशातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यक्ती बाजूला करण्याची गरज आहे. त्यांच्याविरोधातच प्रचार केला पाहिजे. याचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना होऊ दे.
आता विधानसभेच्या कामाला लागा
आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे आता विधानसभेच्या कामाला लागा. आता मी पुढची भूमिका गुढीपाडव्याला सांगेन, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.