Loksabha 2019 : रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

Loksabha 2019 : रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आज (बुधवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. मोहिते-पाटील घराण्यातून पक्षांतराची ही सातवी फेरी आहे. रणजितसिंहांचे आजोबा दिवंगत शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासूनच पक्षांतराची किमया सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज त्यांनी भाजपप्रवेश केला. 

अकलूज (ता. माळशिरस) भागाला नंदनवन प्राप्त करून देणारे रणजितसिंह यांचे आजोबा शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1952 मध्ये स्वतंत्र पक्षाकडून निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणला होता. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून 1957 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. पहिल्यापासूनच घरात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com