Loksabha 2019 : 'मावळ'साठी पुण्यातील नगरसेवकांना जबाबदारी

Loksabha 2019 : 'मावळ'साठी पुण्यातील नगरसेवकांना जबाबदारी

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार विजयी व्हावे, यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. पुण्यातील काही नगरसेवकांची अजित पवार यांनी आज (बुधवार) बारामती हॉस्टेलमध्ये सकाळी बैठक घेतली. या बैठकीमध्ये पिंपरी विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून रवींद्र माळवदकर, मावळ विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून विजय कोलते आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून बाबूराव चांदेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वडगाव शेरी परिसरातील दहा ते बारा नगरसेवकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील अन्य नगरसेवकांनाही मावळ लोकसभा मतदार संघामध्ये काम करण्यासाठी जाण्यास पवार यांनी सांगितले आहे. या बैठकीनंतर पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या नातेसंबंधांची माहिती घेतली. त्यानुसार संपर्क यंत्रणा उभी करण्याच्या आदेश कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी व्यूहरचना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गुरुवारी (ता. 21)  निसर्ग मंगल कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि विविध सेलच्या अध्यक्षांनाही बोलविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com