Loksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न!

Sam-Pitroda
Sam-Pitroda

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. यावर बोलताना पंतप्रधान नरेंदी मोदींना त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच विरोधी पक्षाकडून सुरक्षायंत्रणांचा अपमान झाल्याचेही मोदी म्हणाले. परंतु, आपण सामान्य नागरिक म्हणून नेमके काय झाले हे जाणून घेतले पाहिजे असे मी म्हणालो, मी काँग्रसेच्या वतीने कोणतेही विधान केले नसल्याचे पित्रोदा म्हणाले आहेत.

मोदी सॅम पित्रोदा यांच्यावर टीका करताना विरोधी पक्षाकडून सुरक्षायंत्रणांचा अपमान झाल्याचे म्हणाले होते. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी सारवासारव केली आहे.   

पाकिस्तान दहशतवादाचे नंदनवन असल्याचे आपल्याला माहित असताना काँग्रेस पाकिस्तान आणि दहशतवाद या दोघांना वेगळे करु पाहत असल्याचेही मोदी म्हणाले आहेत. 

मोदींनी ट्विट करत सॅम पित्रोदा यांच्या विधानाला टॅग केले होते. तसेच त्यांनी जनतेला अशा प्रकारे सुरक्षायंत्रणाचा अपमान करणाऱ्या विरोधी पक्षाला जाब विचारण्याचे आवाहन केले. तसेच 130 कोटी भारतीयांचा आपल्या सुरक्षायंत्रणावर विश्वास असून, सर्व भारतीय त्यांच्या पाठिशी असल्याचेही मोदी म्हणाले. त्यानंतर, ''मला एक नागरिक म्हणून सत्य काय आहे, हे कळाले पाहिजे तो माझा हक्क आहे'', असे पित्रोदा म्हणाले आहेत. 

#JantaMaafNahiKaregi असा हॅशटॅगही मोदींनी पित्रोदांवर निशाणा साधताना वापरला होता. तसेच एका ट्विटमध्ये जगभरातून पाकिस्तानकडे दहशतवादी देश म्हणून पाहिले जात असताना पित्रोदा पाकला क्लीन चिट देत असल्याचे मोदींना म्हटले.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com