Loksabha 2019 : सहाव्या टप्प्याचा प्रचार समाप्त; मतदान उद्या; 979 उमेदवार रिंगणात 

Loksabha 2019 : सहाव्या टप्प्याचा प्रचार समाप्त; मतदान उद्या; 979 उमेदवार रिंगणात 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी थांबला. या टप्प्यातील 59 जागांसाठी रविवारी (ता. 12) मतदान होणार आहे. आजी, माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय यात होईल. 

सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी सहावा टप्पा महत्त्वाचा आहे. यातील 59 जागांपैकी 44 जागा भाजपने 2014 च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. या वेळी त्या कामगिरीची पुनरावृत्ती भाजपला करता येईल काय, याकडे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांतील मतदानात 325 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंदिस्त झाले आहे.

सहाव्या टप्प्यात बिहारमधील आठ, हरियानातील दहा, झारखंडमधील चार, मध्य प्रदेशातील आठ, उत्तर प्रदेशातील चौदा, पश्‍चिम बंगालमधील आठ आणि दिल्लीतील सात अशा एकूण 59 जागांसाठी 979 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 10.17 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून 1.13 लाख केंद्रे यासाठी उभारण्यात आली आहेत.

या टप्प्यात होणाऱ्या भोपाळमधील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर विरुद्ध दिग्विजयसिंह यांच्यातील लढतीने देशाचे लक्ष वेधले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, मेनका गांधी, राधामोहनसिंह, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, अजय माकन, क्रिकेटपटू गौतम गंभीर, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, योगी सरकारमधील मंत्री असलेल्या रिटा बहुगुणा, माजी मंत्री डॉ. रघुवंशप्रसाद या बड्या चेहऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com