Loksabha 2019 : बसप उमेदवाराकडून काँग्रेस खासदाराला चपलेने मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- काँग्रेसचे राज्यसभा खासदारांना दिली ही धमकी.

- खासदारासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मारण्याची धमकी.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. असे असताना बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांना चपलेने मारण्याची धमकी दिली आहे.

फतेहपूर सिकरी येथील प्रचारसभेत गुड्डू पंडित यांनी राज बब्‍बर आणि त्‍यांच्या समर्थकांना एकप्रकारे धमकीच दिली आहे. यामध्ये गुड्डू पंडित यांनी सांगितले, की 'ऐका राज बब्बरच्या कुत्र्यांनो, तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना पळवून पळवून चपलांनी मारीन. जे समाजामध्ये चुकीचा समज पसरवत आहेत, अशा लोकांना चपलांनी मारीन. तसेच तुझ्या दलालांनाही मारीन.' याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.  

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांनी विशिष्ट टीका केली. या टीकेनंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत संबंधितांवर काही तासांची प्रचारबदी लागू केली. त्यानंतरही आता पंडित यांनी हे वक्तव्य केले आहे. 

Web Title: Slap by Chappal Threaten to Raj Babbar from BSP Candidate Guddu Pandit