Loksabha 2019 : सुनेत्रा पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ 

मिलिंद संगई
गुरुवार, 4 एप्रिल 2019

बारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आजपासून बारामती तालुक्यात प्रचारास प्रारंभ केला. आज गुनवडी गावापासून त्यांनी कोपरा सभा व भेटीगाठींना प्रारंभ केला. 

भाजपच्या सरकारने सर्वच पातळ्यांवर लोकांची निराशा केलेली असून शेतक-यांच्या तोंडालाही पाने पुसली आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना निवडून देण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. बेरोजगारी, नोटाबंदीमुळे बाजारात आलेली मंदी तसेच शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. अशा अनेक मुद्यांवर केंद्र व राज्यातील सरकार अपयशी ठरलेले आहे. त्या मुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी करुन ही स्थिती बदलण्यासाठी बारामतीकरांनी मदत करावी, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. 

सुप्रिया सुळे यांनी गेल्या पाच वर्षात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भरीव काम केलेले आहे. सलग काही वर्षे त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळत आहे. अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. रस्ते, रेल्वे, दूरध्वनी या सह इतरही अनेक बाबतीत त्यांनी लोकसभा मतदारसंघातील समस्यांचे निराकारण केले आहे, त्यामुळे आगामी पाच वर्षात सुप्रिया सुळे यांनाच पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन पवार यांनी केले. 

Web Title: Sunetra Pawar started campaigning for Supriya Sule in Baramati taluka from today